Vijay Melava Uddhav Thackeray Speech:
मुंबई : "आमच्या दोघातील अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला. आमचं एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. आम्ही दोघांनी त्यांचे वापरा आणि फेकून द्या धोरण अनुभवलं आहे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकणार आहाेत , अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरील युतीची घोषणाच केली.
अनेक वर्षांनी राज आणि माझी जाहीर व्यासपीठावर भेट झाली. त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे संबोधले. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे, असे सांगत सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात केली.
राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी आयाोजित विजय मेळावात बाोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "प्रत्येकवेळीस आम्ही एकत्र येणार का,असा प्रश्न त उपस्थित केला जात होता. आता आमचा म हा मराठीसाठी नाही तर महापालिकेसाठी आहे, असा आरोप केला जात आहे. मात्र आम्ही सत्तेसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत"
मराठी माणूस आपआपसात भांडला आणि दिल्लीतील गुलाम आपल्यावर राज्य करु लागले आहेत. पुन्हा एकदा ते आपल्या मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता तुम्ही पालख्याचे भोई होणार की मराठीला पालखीत बसवणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्ही काेणत्याही भाषेच्या विराेधात नाही. मात्र हिंदीची सक्ती कधीच सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री असताना हिंदी भाषेंची सक्ती केली नव्हती. आता हिंदी भाषेची सक्ती मान्य करणार नाही, असा इशारही उद्धव ठाकरे यांनी केला.
तुम्ही मराठी लोकांसाठी न्याय मागणार्यांना गुंड म्हणत असताल तर आम्ही गुंड आहोत. तुम्ही शिवसेनेचा आमचा पुरेपूर वापर केला आहे, तुम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा नसता, तर तुम्ही येथे असता का, आम्हाला हिंदुत्व शिकवणारे तुम्ही कोण? असे सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्यावेळी एकजूट झाली तशी एकजूट करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षामधील मराठी लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
एक गद्दार काल जय गुजरात बोलला. पुष्पा चित्रपटातला दाढीवाला झुकेगा नही साला म्हणाला; पण हा दाढीवाला उठेगा नही साला म्हणतो. काहीही झालं तरी उठेगा नही, असं म्हणतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
आम्ही एकत्र आलो की, आता काड्या घालण्याचे उद्योग होतील, असा इशारा देत कुणाच्याही लग्नात भाजपावाल्यांना बोलावू नका. येतील जेवण करतील आणि नवरा-बायकोत भांडण लावून जातील. नाहीतर नवरीला पळवून नेतील. भाजपाचे हेच उद्योग आहेत. भाजपाचे स्वतःचे काहीही नाही, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.