Uddhav Thackeray Raj Thackeray Meet | तब्बल १९ वर्षांत उद्धव - राज ठाकरे कितीवेळा एकत्र आले?

अविनाश सुतार

मार्च 2006

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यापासून त्यांचा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला

17 जुलै 2012

उद्धव ठाकरेंच्या छातीत दुखू लागल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी अलिबाग येथील मनसेचा कार्यक्रम सोडून राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि आईसोबत रूग्णालयात दाखल झाले होते

17 नोव्हेंबर 2012

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले होते.

10 जानेवारी 2015

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले होते. यावेळी राज ठाकरे यांनी हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

12 डिसेंबर 2015

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते.

27 जानेवारी 2019

राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य यांच्यासह हजेरी लावली होती.

28 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.

23 जानेवारी 2021

कुलाब्यातील शामाप्रसाद मुखर्जी चौकातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते.

22 डिसेंबर 2024

राज ठाकरेंच्या बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त दादरमधील राजा शिवाजी विद्यालयात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.

24 फेब्रुवारी 2025

अंधेरीतील एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते

5 जुलै 2025

आता तब्बल 19 वर्षांनंतर हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत.

Wari | राम कृष्ण हरीचा नेमका अर्थ काय ?