मुंबई

राज ठाकरेंवर बोलून त्याचं महत्त्‍व वाढवायचे नाही : शरद पवारांचा टाेला

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: मनसे नेते राज ठाकरे याच्यावर बोलून त्याचं महत्व वाढवायचे नाही, असा टोला राष्टवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला.

राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर टीका केली हाेती. याबाबत पवारांना विचारण्‍यात आले. यावर ते म्‍हणाले, "मला राज ठाकरे यांच्‍यवर बाोलवून त्‍यांचे महत्त्‍व वाढवायचे नाही."

राज ठाकरे  पुण्‍यातील सभेत म्‍हणाले हाेते की,  "एमआयएमच्या औलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? अफजल खानाच्या मशिदीचा किती विस्तार झालाय, ते बघा. आम्ही भोंग्यांचा विषय काढला, तर आवाज बंद झाला. जो कायदा सांगतो, त्यालाच नोटीशी पाठवता? राज्यातल्या २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीशी पाठवल्या. या विषयावर चर्चा कसल्या करता? "

मनसे प्रमुख राज यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश देणार नाही, अशी धमकी दिली हाेती. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये शक्तीप्रदर्शनदेखील केले होते. त्यानंतर प्रकृतीचे कारण देत ठाकरेंचा अयोध्या दौरा अचानक रद्द करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT