शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत 2 जनावरांचा मृत्यू | पुढारी

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत 2 जनावरांचा मृत्यू

वाडा : पुढारी वृत्तसेवा

वाडा (ता. खेड) येथील पाटील वस्तीवर शेतकरी नागेश हुंडारे यांच्या गोठ्याला शनिवारी (दि. 21) अचानक दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास आग लागून त्यात 2 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत शेतकर्‍याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. वाडा (ता. खेड) पाटीलवस्ती येथे शेतकरी नागेश हुंडारे यांच्या राहात्या घराजवळ असलेल्या गोठ्यातील गायी व बैल जोरजोरात हंबरू लागल्याने ते पाहण्यासाठी घरात असलेले पार्वताबाई हुंडारे हे बाहेर आले.

सलमानचं मेहुण्यासोबत बिनसलं?, आगामी चित्रपटातून आयुषची एक्झिट

त्यावेळी गोठ्याला मोठ्या प्रमाणावर आग लागून आगीचे लोळ उठत होते. त्यांच्यासह मुलगा नागेश आणि ग्रामस्थ पांडुरंग हुंडारे, नारायण हुंडारे, बंटी हुंडारे, बाबाजी हुंडारे, महेश हुंडारे, अभिषेक हुंडारे यांनी पाण्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हवा जास्त असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होते.

PM Modi : जपानचा दौरा विशेष का आहे ? पंतप्रधान मोदींनीच केलं स्पष्ट

गोठा कुडाचा असल्याने आग मोठ्या प्रमाणावर होती. गोठ्यातील गाईने कशीबशी सुटका करून घेतली. मात्र थोड्या वेळातच तिचा मृत्यू झाला. यासह 1 बैलाचादेखील मृत्यू झाला असून गुरांचा चाराही जळून खाक झाला. दरम्यान, मंडल अधिकारी शारदा बढे, कोतवाल संदेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला आहे.

Back to top button