Sanjay Raut On Plane Crash: अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक वक्तव्ये केली आहेत. जरी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विमानाला अपघातच झाला होता. हा घातपात वाटत नाही असं सांगितलं असलं तरी संजय राऊत यांनी अनेक नेत्यांना भविष्यात विमान प्रवास करताना सावधान राहण्याचा एकप्रकारे इशारा दिला आहे.
संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, 'विकिपीडिया फास्ट यंत्रणा आहे मात्र त्या घटनेवर बोलण्याची ही वेळ नाही. तांत्रिक चुका विमान बिघाड विमानतळ यासंदर्भातील चौकशी ही डीजीसीएच्या माध्यमातून होत असते.'
राऊत पुढे म्हणाले की, 'शरद पवार यांनी हा अपघातच आहे असं सांगितलं आहे. मात्र माजी मंत्री किंवा आजपर्यंत झालेल्या विमान अपघातांच्या चौकशीचं काय झालं असा सवाल देखील विचारला. खासगी विमाने अनेकजण वापरत असतात. बारामतीच्या छोट्या विमानतळावर अजित पवार अनेकवेळा उतरले असतील. कालच्या विमान अपघातानंतर देखील अनेक विमाने तिथं उतरली आहेत.'
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अनेक अपघातांच्या चौकशीचे पुढे काय झाले. याचा अहवाल देशासमोर कधी आला नाही असं म्हणत अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी काय झाले याचा अहवाल समोर आला पाहिजे. तांत्रिक कारणामुळे अपघात झाला असले तर सर्व माहिती समोर आली पाहिजे अशी मागणी केली.
राऊतांनी राजकारणी आता खूप बिझी झाले आहेत. पूर्वी ते रेल्वे आणि रस्त्याने प्रवास करायचे. आता ते विमानाने प्रवास करतात. अजित पवार यांचा अपघात महाराष्ट्राची जनता पाहत आहे. एकनाथ शिंदे यांचे देखील अनेक विमान दौरे असतात. अजित पवारांचा हा अपघात महाराष्ट्र पचवू शकलेला नाही.
राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उशिरा बारामतीत पोहचले. ते बाय रोड गेले. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तिथंच आहेत.
राऊत यांनी दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकतं. दादा वन मॅन शो होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदाच विमान प्रवास केला नाही. शंका सर्वांना आल्या आहेत. चौकशी व्हायला हवी. भविष्यात अनेक नेते विमान प्रवास करतात त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. जनतेसमोर अपघाताची कारणे आली पाहिजेत. अपघात झाल्याय... पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री सर्वचजण श्रद्धांजली वाहतात मात्र चौकशी झाली पाहिजे.