

मुंबई - अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या AI 171 या विमान अपघातात कॅप्टन सुमित सभरवाल मृत्युमुखी पडले होते. त्यांचे पार्थिव आज पवईत आणण्यात आले. सुमित सभरवाल हे या विमानाचे मुख्य वैमानिक होते. ते एअर इंडियात लाईन ट्रेनिंग कॅप्टन या पदावर काम करत होते. पवईतील जलवायू विहार संकुलात ते वास्तव्यास होते.
एक अधिकाऱ्याने सांगितलं की, कॅप्टन सभरवालचे पार्थिव सकाळी विमानाने मुंबई एअरपोर्ट येथे पोहोचले. तेथून त्यांचे कुटुंबातील सदस्य पार्थिव पवईतील जलवायु विहार येथील निवासस्थानी घेऊन गेले.
तसेच 'एअर इंडिया'च्या सीनियर ग्रुप मेंबर श्रद्धा ढवळ श्रद्धा धवन यांचे पार्थिव रात्री मुलुंड येथील कल्पतरू या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. एअर इंडियामध्ये त्या सीनियर ग्रुप मेंबर म्हणून कार्यरत होत्या. १२ जून रोजी लंडनला जाण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांना फोन करून लवकरच भेटू असे सांगितले होते. दुर्दैवाने काही वेळातच त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलुंड येथील कल्पतरू या इमारतीत त्या राहत होत्या. रात्री उशिरा त्यांचा पार्थिव घरी आणण्यात आला.
श्रद्धा धवन यांच्या परिवारात तिचे पती, आई-वडील आणि एक मुलगी आहे. मुलगी इयत्ता १० वीमध्ये शिकत आहे. पती देखील एयर इंडियामध्ये कार्यरत आहत. विमान अपघातानंतर श्रद्धाचे पार्थिव ओळखणेही कठीण झाले होते. डीएनए तपासाच्या माध्यमातून ओळख पटवण्यात आलीय.