
Ajit Pawar Funeral Live: बारामतीत बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झालं. त्यांचे पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अत्यं दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आज (दि. २९ जानेवारी) रोजी सकाळी ११ वाजता अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच अखेरचा निरोप देण्यात येईल. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह देशभरातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
जयंत पाटील, दत्ता भरणे विद्या प्रतिष्ठानच्या vip गेट मधून अंत्यविधी मैदानाकडे रवाना झाले आहेत.
चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश बारामती विमानतळाकडे रवाना झाले आहे.
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे या देखील बारातमतीत दाखल झाल्या आहेत.
काटेवाडीतून दादांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झाल्यावर त्या गाडीच्यामागून कार्यकर्ते देखील धावत जात आहेत.
#WATCH | People in large numbers walk towards Vidya Pratishthan ground to take part in the last rites of Maharashtra Deputy CM Ajit Pawar in Baramati pic.twitter.com/47f7CqgK7p
— ANI (@ANI) January 29, 2026
केंद्रीय मंत्री रामदास अठवले हे बारामतीत पोहचले आहेत.
काटेवाडीच्या ग्रामस्थांनी कापऱ्या आवाजात अजित दादा अमर रहे.. च्या घोषणा दिल्या. तर काटेवाडीतील अनेक बहिणींना अश्रू अनावर झाले.
अजित पवार यांच्या पार्थिवाला काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा पांघरण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानकडे रवाना करण्यात आलं आहे.
अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगाणवर दाखल झाले आहेत.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला पुढारीचे समूह संपादक योगेश जाधव यांची देखील उपस्थिती.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर राज्यातील अनेक नेत्यांचे आगमन सुरू झाले आहे.
शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दाखल झाले आहेत. ते कुटुंबियांशी चर्चा करत आहेत.
बारामतीत आज देशभरातून व्हीव्हीआयपींची ये जा असणार आहे. त्यामुळे बारामतीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
काठेवाडीत अजित पवारांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी काठेवाडीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. पार्थिव पवार फार्ममध्ये दाखल झालं असून कुटुंबीय देखील काठेवाडीत पोहचले आहेत.
#WATCH | Baramati | Mortal remains of Maharashtra Deputy CM Ajit Pawar brought to his Katewadi home ahead of last rites pic.twitter.com/xGb35nJJ8r
— ANI (@ANI) January 29, 2026
अजित पवार यांची अंत्ययात्रा सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव काठेवाडी इथं नेण्यात आलं आहे.