Sada Sarvankar pudhari
मुंबई

Sada Sarvankar: विशाखा राऊत यांची जात सूर्यवंशी क्षत्रिय... नगसेवक पद रद्द करणे योग्यच, सरवणकरांनी लगेच भेटीगाठी केल्या सुरू

Anirudha Sankpal

Sada Sarvankar On Vishakha Raut: शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका विखाशा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा दावा केला. नुकतेच संजय राऊत यांनी फक्त विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध का ठरत आहे असा सवाल करत यामागे राजकारण असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होताच सरवणकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. प्रिया सरवणकरांसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निर्णय योग्यच

त्याच्या प्रत्युत्तरात आता सदा सरवणकर यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, 'कागदपत्र अवैध ठरवली हा योग्यच निर्णय आहे. त्यांनी प्रमाणपत्रासाठी दिलेली कागदपत्रे पाहिली तर समजेल की त्यांच्यावर किती दबाव टाकण्यात आला होता. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्ताचा सबंध असावा लागतो.

त्या सूर्यवंशी क्षत्रिय

सदा सरवणकर पुढे म्हणाले की, 'त्यांची जातच सूर्यवंशी क्षत्रिय आहे. हा संपूर्ण समाज आहे. त्या त्यांच्यापैकीच एक आहेत. असे असताना प्रमाणपत्र कसे काय मिळवले. त्यांच्या स्वतःच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू असा उल्लेख आहे. जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे.

सरवणकरांच्या भेटीगाठी

सरवणकर यांनी ही कायदेशीर लढाई आहे असे म्हणत आम्ही सुद्ध त्या प्रक्रिया करणार आहोत. आतापर्यंत ज्या नगरसेवकांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहेत त्यांचे नगरसेवक बद रद्द झाले आहेत. आता कोण नगरसेवक होईल कोणाला देतील हे आज सांगणे कठिण आहे.

विशाखा राऊत यांनी स्वतःचे जे प्रमाणपत्र दिले होते. त्यातील मी मजूर असल्याचे लिहिले आहे. वडील अशिक्षित आहेत असे सांगितले आहे. सरकारची दिशाभूल केली आहे. आता गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT