सदा सरवणकर यांचे महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान; याचिका दाखल

Sada Sarvankar vs Mahesh Sawant| माहीम विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापणार
 Sada Sarvankar vs Mahesh Sawant
माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरवणकर यांनी सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी (दि.२८) सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माहीम विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापणार आहे.

महेश सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रावर चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप सदा सरवणकरांनी याचिकेतून केला आहे. गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दाखवणे आवश्यक आहे. मात्र, जनतेची दिशाभूल करुन स्वत: वरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप सावंत यांच्यावर याचिकेतून केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news