Pulmonary Embolism Case Pudhari
मुंबई

Pulmonary Embolism Case: जीवघेण्या दुहेरी आजारावर मात; डॉक्टरांनी वाचवला महिलेचा जीव

फुफ्फुसातील रक्तगाठीसह ४ किलोची गर्भाशयातील गाठ; जटिल शस्त्रक्रियेतून यशस्वी उपचार

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : अचानक धाप लागणे, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना, चक्कर येऊन कोसळणे आणि बेशुद्ध होणे अशी गंभीर लक्षणे दिसल्यानंतर 51 वर्षीय महिलेवर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार करून तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. रुग्णाला एकाच वेळी पल्मोनरी एम्बोलिझम (फुफ्फुसातील रक्ताची गुठळी) आणि गर्भाशयातील मोठा फायब्रॉइडसारखी दुहेरी गंभीर समस्या असल्याचे तपासणीत आढळले.

या रुग्णावर डॉ. बादल ताओरी (इंटर्नल मेडिसिन), डॉ. अनुरंजिता पल्लवी (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. धार्मिक भुवा (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. विवेक (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) या पथकाने संयुक्तपणे उपचार केले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावात राहणारी रुग्ण ओनिझा गीते ही जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती. 5 फेब्रुवारी रोजी रुग्णाला डॉ. बादल ताओरी यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला जुलाब आणि पोटऱ्यांमध्ये सतत वेदना होत होत्या. त्यामुळे तिला तत्काळ आयसीयूमध्ये हलवण्यात आले. सीटी पल्मोनरी अँजिओग्राफीमध्ये मुख्य फुफ्फुसीय धमनीत एक जीवघेणी सँडल-आकाराची रक्ताची गुठळी असल्याचे दिसून आले.

इंटर्नल मेडिसिन विभागातील डॉ. बादल ताओरी यांनी सांगितले, की, जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तिला प्रचंड धाप लागत होती, तिची प्रकृती गंभीर होती. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी-जास्त होत होती आणि नाडीचे ठोके वाढले होते. सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांच्या धमन्यांच्या मुख्य भागात रक्ताची एक मोठी गुठळी आढळली. ती दोन्ही फुफ्फुसांचा रक्तप्रवाह रोखत होती. हा पल्मोनरी एम्बोलिझमच्या सर्वात धोकादायक प्रकारांपैकी एक आहे, कारण त्यामुळे हृदयावर अचानक ताण येऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 7 फेब्रुवारी रोजी, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट

डॉ. धर्मिक भुवा यांनी मांडीच्या शिरेद्वारे मेकॅनिकल कॅथेटर-डायरेक्टेड थ्रोम्बेक्टॉमी, थ्रोम्बोॲस्पिरेशन आणि थ्रोम्बोलिसिस ही प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेमध्ये, पायातील शिरेतून एक पातळ नळी घालून ती काळजीपूर्वक फुफ्फुसांच्या धमन्यांपर्यंत पोहोचवली जाते, जेणेकरून रक्ताची गुठळी यांत्रिकरित्या फोडून काढता येईल आणि त्याच वेळी गुठळी विरघळवणारे औषध थेट त्या जागी पोहोचवता येईल. पायाच्या डॉप्लर तपासणीत गहन शिरा गुठळी आढळून आली नाही. 10 फेब्रुवारी रोजी, भविष्यात कोणत्याही गुठळ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी रुग्णावर व्हेनोप्लास्टी आणि इन्फ्रा-रेनल आयव्हीसी फिल्टर बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

फायब्रॉइड आकाराने मोठे होते, जे छातीच्या हाडापर्यंत (झिफिस्टरनम) पोहोचले होते. तीन तास चाललेल्या एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे, पोटावर छेद देऊन 30 सेमी (4 किलो वजनाची) गर्भाशयातील मोठी गाठ काढण्यात आली. योग्य वेळी उपचार न केल्यास रुग्णाचा धोक्यात आला असता. अशा प्रकरणाचे अचूक व्यवस्थापन करण्यासाठी अतिदक्षता विभाग, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी आणि स्त्रीरोग विभाग यांच्या टीममध्ये समन्वयाची आवश्यकता असते. वेळीच निदान, अचूक निर्णयक्षमता आणि टिमवर्कमुळे रुग्णाचा जीव वाचला.
डॉ. अनुरंजिता पल्लवी, स्त्रीरोगतज्ज्ञ, मेडीकव्हर रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT