Praful Patel on Legislative Council Election Pudhari Photo
मुंबई

Praful Patel : 'पक्षाला कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज' ; विधान परिषद निवडणूक निकालानंतर प्रफुल पटेलांचा पक्षाला घरचा आहेर

संघटनेत सुधारणा करण्याची तातडीची गरज असल्याची मांडली स्पष्ट भूमिका

पुढारी वृत्तसेवा

Praful Patel on Legislative Council Election : "आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाला कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज", अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांचा पक्षाला घरचा आहेर. विधान परिषदेचे निकाल जाहीर होत असताना पटेल यांनी एक्स पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची गरज

राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी; राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील

दरम्यान, आज (दि. २८ ऑक्टोबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी तर राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री पवार व खासदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जनसेवेचा वारसा पुढे नेत : सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

दिवंगत अजित पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने कार्य करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT