Pradeep Sharma Antilia Case Pudhari
मुंबई

Pradeep Sharma Antilia Case: वादग्रस्त प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाचा झटका; अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषमुक्तीची याचिका फेटाळली

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषमुक्तीची याचिका फेटाळली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणा () कडून आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा करणा-या प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाने मंगळवारी झटका दिला.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने शर्मा यांचा सहभाग सिद्ध करण्याकरता एनआयएकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचा तपासयंत्रणेचा दावा मान्य करत प्रदीप शर्मा यांची याचिका फेटाळून लावत त्यांना याप्रकरणी खटल्याला सामोर जावंच लागेल असे स्पष्ट केले.

25फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार आढळली होती. ही कार स्फोटकांनी भरली होती. या घटनेनंतर दहा दिवसांनी 4 मार्च रोजी या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला होता. त्यांनी संबंधित कार चोरीला गेल्याची तक्रारही दाखल केली होती. सुरूवातीच्याकाळात एटीएसकडे हा तपास होता. मात्र एप्रिल 2021 मध्ये, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हा तपास हाती घेतल्यानंतर, या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन एपीआय सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह इतर नऊ जणांसह अटक करण्यात आली.

शर्मा यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात दोषमुक्तीची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती फेटाळल्यानंतर शर्मा यांनी हायकोर्टात आव्हान दिले. मंगळवारच्या सुनावणीत तपासयंत्रणेने प्रतिज्ञापत्र सादर करून याचिकेला तीव्र विरोध केला.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हे प्रदीप शर्माच आहेत. इतकंच काय तर हा कथित कट मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतच शिजला होता. ज्यात दावा प्रदिप शर्मांसह इतर आरोपी कटातील अनेक बैठकींना उपस्थित होते. सचिन वाझेनं मनसुख हिरेनच्या हत्येकरता पूर्व तयारीसाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिले होते, असा दावा केला .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT