नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या महासभेत तेराव्या सभागृह नेतेपदी भाजपचे सागर नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे विजय चौगुले यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. चौगुले बारावे विरोधी पक्षनेते आहेत.
पहिले सभागृहनेते श्याम महाडिक यांना 1995 नंतर 2000 मध्ये ही संधी मिळाली होती. महापालिकेत सर्वाधिक काळ नऊ वर्षे नगरसेवक असलेले जयवंत सुतार यांनी सभागृहनेतेपद भूषविले. याशिवाय 1998 मध्ये सभागृहनेते असलेल्या तुकाराम नाईक व चंदू राणे यांनाही महापौर होण्याची संधी मिळाली.
नवी मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची महासभेत घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे सहा आणि शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिका भाजपा स्वीकृत सदस्यमध्ये कुलदीप सुरी, भरत नखाते, बंडू केणी, अमित मेढेकर, लक्ष्मीकांत पाटील आणि ॲड. अपर्णा गवते तर शिवसेना स्वीकृत सदस्यपदी द्वारकानाथ भोईर, साहिल देविदास चौगुले, सुरेश भिल्लार,अंकुश बाबा कदम यांची निवड झाली आहे.
डी. आर. पाटील, पंढरीनाथ पाटील, संतोष शेट्टी, नामदेव भगत, दशरथ भगत, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, दिलीप घोडेकर, विजयानंद माने, सरोज पाटील, विजय चौगुले
श्याम महाडिक 1995 ते 1996
दशरथ उर्फ चंदू राणे 1996 ते 1997
अतुल कुलकर्णी 1997 ते 1998
तुकाराम नाईक 1998 ते 1999
जयवंत सुतार 1999 ते 2000
श्याम महाडिक 2000 ते 2004
जयवंत सुतार 2004 ते 2005
जयवंत सुतार 2005 ते 2010
विठ्ठल मोरे 2010 ते 2012
अनंत सुतार 2012 - 2015
जयवंत सुतार 2015 ते 2017
रवींद्र इथापे 2017 ते 2020
सागर नाईक 2026 पुढे
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेत आज झालेल्या महासभेत संख्याबळानुसार भाजपचे दहा आणि शिवसेनेच्या सहा नगरसेवकांची स्थायी समितीवर निवड झाली. आता स्थायी समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी तीन माजी महापौर, एक माजी उपमहापौर,विरोधी पक्षनेते आणि माजी स्थायी समिती सभापती स्याथी समितीत पाठविण्यात आले. समितीवर निवड झालेले दहा सदस्य हे दोन, तीन आणि चारवेळा निवडून आलेले आहेत. पाच ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांना खास करुन भाजपने मार्गदर्शक म्हणून पाठवल्याची चर्चा रंगली होती. महापालिका अधिनियम आणि कामकाजाचा उत्तम अनुभव असलेले सदस्य असल्याने यावेळी अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चांगली चर्चा होईल. सुधारणा, बदल आणि सूचना मांडण्यात येतील.
महासभेच्या पहिल्याच बैठकीत संख्याबळाच्या जोरावर स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्यामध्ये भाजपने आपल्या कोट्यातून अनुभवी आणि निष्ठावान नगरसेवकांना संधी दिली आहे. भाजपकडून जयवंत सुतार (माजी महापौर), सुधाकर सोनवणे (माजी महापौर), शशिकांत भोईर, प्रदीप गवस, अशोक पाटील, सुरेश शेट्टी, सागर नाईक, संदीप म्हात्रे, स्वाती गुरखे आणि अंजली वाळुंज यांची वर्णी लागली. तर शिवसेनेकडून अनिता पाटील, दीपाली सकपाळ, आकाश मढवी, सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील आणि मंदाकिनी म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे.