Naresh Mhaske warns Sanjay Raut 
मुंबई

Naresh Mhaske warns Sanjay Raut: आनंद दिघेंची बदनामी करणे थांबवा नाही तर… ; शिंदेंच्या खासदाराचा राऊताना इशारा

Political clash Maharashtra:...म्हणून खासदार संजय राऊत कायम 'सामना' च्या कार्यकारी संपादक पदावरच

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लोकांसाठी अहोरात्र कष्ट केले, समाजाला वेळ दिला म्हणून आनंद दिघे धर्मवीर झाले. अटक झाले म्हणून नाही ती राजकीय अटक होती. त्यामुळे आनंद दिघेंची बदनामी करणे थांबवा नाही तर ठाण्यातील आहे तेवढी शिवसेना संपेल, असा इशारा एकनाथ शिंदे गटाच्या खासदाराने दिला आहे.

खासदार नरेश म्हस्के पुढे बोलताना म्हणाले, पाच वर्ष नोकरी केली की, बढती मिळते यांची औकात नाही, पात्रता नाही त्यामुळे यांना कधी संपादक बनता आलेले नाही. त्यांनी कोणाची औकात काढत बसण्याची गरज नाही. त्यांची औकात उध्दव ठाकरे यांनी त्याच पदावर ठेवून केली आहे. आपण अटक झाले होते भ्रष्टाचार केल्यामुळे मग तुम्हाला काय भ्रष्टाचारवीर म्हणण्याचे का ? दिघे साहेब यांच्याबद्दल सामनामध्ये छापून आल्याने त्यांना टाडा लागला. त्यांची बदनामी करण्याचे थांबवा.

तुम्हाला काय भ्रष्टाचारवीर म्हणण्याचे का ?

संजय राऊत हा भुंकणारा राहुल गांधी यांचा डॉग आहे. त्यांनी ज्यांची औकात काढण्याचा विषय काढला ते कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. संजय राऊत यांची औकात उध्दव ठाकरे यांनीच दाखवून दिली आहे. बाळासाहेब सामनाचे संपादक होते. त्यांच्यानंतर बाळासाहेब नसताना पत्रकारितेचा काही एक संबंध नसणारे उध्दव ठाकरे संपादक झाले. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा रश्मी ठाकरे संपादक झाल्या. या सर्व काळात संजय राऊत कायम कार्यकारी संपादक पदावरच राहिला, अशी टीका यांनी केली.

नाही तर ठाण्यातील उरलीसुरली शिवसेना संपेल

संजय राऊत यांचे आदेश राजन विचारे, केदार दिघे मान्य करणार का?, दिघे साहेबांचे नाव घेतले नाही तर उरलीसुरली ठाण्यातील शिवसेना संपेल. त्यांना आपल्या मागे बॅनरवर बाळासाहेबांच्या जोडीला आनंद दिघे चालतात. राजन विचारे तुम्हाला फाट्यावर मारतात. सकाळी उठून भुंकतात.

बाळासाहेबांचा आशीर्वाद एकनाथ शिंदेंना होताच

दिघे जिल्हा प्रमुखअसताना अनंत तरे यांना उपनेते पद देऊन त्यांच्या डोक्यावर आणून बसवले होते. झोराष्ट्रियन चॅरिटेबल ट्रस्ट या पारशी ट्रस्टला आपण भडकवत होता., आनंद दिघेंच्या नावे ते करू नका म्हणून. एकनाथ शिंदे यांनी आनंद सेवा संस्था या नावाने ती जागा ५/४/ २०२२ रोजी ३० वर्षांसाठी लीजवर घेतली आहे. उरल्या सुरलेल्या राजन विचारांचा कडेलोट संजय राऊत करणार. ते विनायक राऊत यांचे फॉलोवर आहेत. बाळासाहेबांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना होताच. एकनाथ शिंदे यांनी शेंदूर लावला तेव्हा राजन विचारे खासदार झाला त्यांनी शेंदूर लावला नाही म्हणून खासदारकी गेली.

राहुल गांधी विदूषक, डोंबारीचे खेळ खेळतात

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे कर्तृत्व दाखवून दिले आहे. दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांची आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्या तरुणावर जळण्याची तुमच्यावर वेळ का आली. राहुल गांधी विदूषकाचे काम करतात. डोंबारीचे खेळ खेळतात. त्यांच्यासारखे आजुबाजूला कोण असो नसो हे डंबरू वाजवत बसतात. स्वतः ची हार लपवण्यासाठी खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा चालवलेला केविलवाणा प्रयत्न आहे.

राजकारणामध्ये संयम बाळगायला पाहिजे

संजय राऊत यांच्या आनंद दिघे यांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर दिघे साहेबांवर प्रेम करणारे सच्चे सैनिक अस्वस्थ आहेत. काही दिवसात त्यांच्या अस्वस्थतेचे चित्र दिसेल. राजकारणामध्ये काही संयम बाळगायला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर टीका टाळली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT