

Sanjay Raut protest Mahad
महाड : दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर लावला जात असल्याने आक्षेप व्यक्त केला होता. आनंद दिघे जिल्हाप्रमुख होते, त्यांची बाळासाहेबांबरोबर तुलना होऊ शकत नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. यावर आता शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर शिवसैनिक संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेना महाड शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर, महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई, युवा सेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे, विन्हेरे विभाग प्रमुख आनंत सावंत, नितीन आर्ते, युवा सेना महाड शहर संघटक निखिल शिंदे यांच्यासह, शिवसेना युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.