Sanjay Raut : भाजप दुतोंडी गांडूळच; पण देवेंद्र फडणवीसांचं कौतुक : संजय राऊत

मुंबईत मराठा आंदोलक आले असताना दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री कोठे होते?
Sanjay Raut
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

Sanjay Raut praises Devendra Fadnavis : "मनोज जरांगे-पाटील मुंबईत आल्‍यानंतर भाजप नेत्‍यांची भाषा बदलली. त्‍यांनी त्‍यांच्‍याविषयी अत्‍यंत हीन भाषा वापरली. मराठा समाजाविषयी द्वेष पसरवण्‍याचे काम भाजपचे नेते करत होते. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांच्‍या संयमाचे कौतूक करतो. ते पडद्यामागे राहून सूत्र हलवत होते. कालच्‍या शिष्‍टाईचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मी त्‍यांचा टीकाकार असलो तरी कालच आंदोलनात तोडगा काढण्‍यात त्‍यांचे योगदान मोठे होते. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो," अशा शब्‍दांमध्‍ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे माध्‍यमांशी बोलताना कौतुक केले.

भाजपचे नेते जरांगे यांची कुचेष्‍टा करतात

भाजपचे नेते अजूनही जरांगे यांची कुचेष्टाच करतात. भाजपचे पडद्यामागचे म्हणणे वेगळे आहे. भाजप दुतोंडी गांडुळासारखा आहे. जरांगे पाटील यांच्याबाबतीत भाजप नेत्यांची भाषा हीन दर्जाची होती. ती भाषा एकदा पंतप्रधान मोदींनी ऐकावी. जरांगे आणि मराठा आंदोलकांबाबत त्यांचे नेते कोणती भाषा वापरत होते, तेही ऐकावं त्यांनी. जरांगे पाटील इथं आल्यावर जे टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला. घाणेरडी भाषा वापरली, फक्त फडणवीस यांनी ही भाषा वापरली नाही त्यांच्या संयमाचे कौतुक करतो. आंदोलन सुरु असताना देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे राहून सूत्र हलवत होते. कालच्‍या शिष्‍टाईचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मी त्‍यांचा टीकाकार असलो तरी कालच आंदोलनात तोडगा काढण्‍यात फडणवीस यांचे योगदान मोठे होते. त्याचवेळी भाजपमध्ये बाहेर आलेले नेते यांनी ज्याप्रकारे जरांगेविषयी भाषा वापरली ती समर्थनीय नाही. नंतर लगेच त्याचे श्रेय घ्यायला येतायत. नक्की तुम्ही कोण व भूमिका काय ?, असा सवालही राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Satara politics: संजय राऊत यांच्या टीकेवर उदयनराजेंचा पलटवार; मराठा आरक्षणावरही केलं मोठं विधान

मुंबईत मराठा आंदोलक आले असताना दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री कोठे होते?

माध्‍यमांशी बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, एकनाथ शिंदे जरांगेच्‍या मागील आंदोलनातावेळी नवी मुंबईत गुलाल उधळण्‍यास पुढे होते. आता ते कोठे होते. कालच्‍या आंदोलनात दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री कोठे होते? उच्‍च न्‍यायालयात सुनावणी सुरु असताना दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री मुंबईतच उपस्‍थित असायला हवे होते. त्‍यांना मुंबईतील परिस्‍थिती चघळवून फडणवीस यांचे मुख्‍यमंत्री पद धोक्‍यात आणायचे होते, असा सवालही त्‍यांनी केला. जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मुंबईत मोठे आंदोलन झाले. काल सरकारने मागण्या मान्य केल्या, जर जरांगे व आंदोलक समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. नवी मुंबईतही त्यांनी गुलाल उधळला होता. आता मुंबईतील गुलालात व नवी मुंबईच्या गुलालात काय फरक आहे ते बघावं लागेल, असेही राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule | संजय राऊत कमी बोलले असते, तर उद्धव ठाकरेंच्या जागा वाढल्या असत्या : चंद्रशेखर बावनकुळे

भुजबळांनी आकांडतांडव करु नये

मंत्री छगन भुजबळांचे मत बरोबर आहे;पण जोपर्यंत काही समोर येत नाही तोवर आकांडतांडव करू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार मराठी माणसाची एकजूट कायम राहिली पाहिजे. मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठी बांधव मुंबईत आले. मुंबई तुमचीच आहे हे सांगितले. त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात शिवसैनिक व मनसैनिकांनी चांगले काम केल्‍याचे राऊत म्‍हणाले.

Sanjay Raut
Sanjay Raut: भाजप राष्ट्रद्रोही पक्ष, हे त्यांनी स्वत: सिद्ध केलं; खासदार संजय राऊत यांची टीका

उपोषण नक्की संपले; पण आंदोलन संपलेले नाही

मराठा आरक्षणासंदर्भात अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्यापुढं दुसरा पर्याय नव्हता. हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना निर्णय घ्यावा लागला, असा दावाही राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Political News: महाविकास आघाडी एकत्र लढेल, पण निर्णय स्थानिक पातळीवर: संजय राऊत

पुढील काही महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होईल

राहुल गांधी यांच्‍या 'हायड्रोजन बॉम्‍ब' विधानाबाबत बोलताना राऊत म्‍हणाले की, त्यांची आमच्याशी चर्चा झाली आहे. त्यानंतरच ते बोलले आहेत. मतचोरी हा अणुबॉम्ब होता. इतर काही माहिती त्यांच्याकडे आली आहे. पुढील काही महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होईल. त्याला 'हायड्रोजन बॅाम्ब' कारणीभूत असेल. मोदी हे विदेशी दौर्‍यावर आहेत सध्या शेवटचे पर्यटन करून घेतायत. कुणीही त्या यात्रेत मोदींच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news