मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्रातून 1 कोटी 20 लाख लिटर पाणी मिळणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा सल्लागार येत्या लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे.
मुंबईत पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने नवीन जलस्रोत निर्माण करण्यासह सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व उपनगरात सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. यात कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्रात 12 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा तृतीय स्तरावरील जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. कुलाबा येथील मलजल केंद्रांमध्ये 37 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यापैकी 12 दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर तृतीय स्तरावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दररोज 1 कोटी 20 लाख लिटर विनायोग्य पाणी उपलब्ध होईल असे पालिकेचे नियाजन आहे.
तृतीय स्तरावरील जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागारामार्फत पाण्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करणार, पाणी पिण्यायोग्य कसे होणार, त्या पाण्याचा
मुंबई शहराला पुरवठा करणे, निर्माण होणाऱ्या पाण्याच्या विविध चाचण्या करण्यासह अन्य प्रकल्प अहवाल बनवण्यात येणार आहे.
सध्या प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असलेल्याचे पालिकेच्या मलनि: सारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी महापालिकेने 30 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
भांडुप संकुल येथील उपकाच्या उत्खननाचे काम प्रगतीपथावर असून हे काम
मे 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर जानेवारी 2027 पासून जल बोगद्याच्या खोदण्याचे काम सुरू
होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. या कामासाठी निधी कमी पडू नये म्हणून सुमारे 520 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.