Chembur Building Accident: चेंबूर इमारत दुर्घटनेतील आणखी एका मजुराचा मृत्यू; मृतांचा आकडा दोनवर

सुभाषनगर येथील पुनर्विकास इमारतीतून सहा मजूर कोसळले; बिल्डरवर अद्याप गुन्हा नसल्याने प्रश्नचिन्ह
Chembur Building Accident
Chembur Building AccidentPudhari
Published on
Updated on

मुंबई : चेंबूरच्या सुभाषनगरमधील इमारत दुर्घटनेतील जखमी झालेल्या आणखी एका मजुराचा बुधवारी राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुणाधर रॉय (22) असे त्याचे नाव असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहचली आहे. अद्याप बांधकाम व्यावसायिक आदित्यराज याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Chembur Building Accident
Maharashtra Cancer Treatment Policy: राज्यात कॅन्सर उपचारांसाठी त्रिस्तरीय पद्धती लागू; सर्व जिल्ह्यांत स्क्रीनिंग सेवा उभारणार

सुभाषनगरमधील ही म्हाडाची इमारत क्र. 36 असून तिचा खासगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास सुरू आहे. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास सहाव्या मजल्यावर परांंचीवर उभे राहून सहा मजूर प्लास्टरचे काम करत असताना ते खाली कोसळले. त्यात रामनजेनेल्लू देशपोगू (55) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गुणाधर रॉय (22), कुस रॉय (30), विजयकुमार मेवालाल मोर्या (35), संदीप रॉय (27), रमेश रॉय (25) हे चार मजूर गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी गुणाधर रॉय (22) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Chembur Building Accident
Mumbai Vijaydurg Ro Ro ferry: मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला जयगड व वेंगुर्ला येथे नवे थांबे; महिनाभरात जेट्टी काम पूर्ण होणार

यापूर्वीही दुर्घटना

या इमारतीचे काम सुरू असताना यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. त्यानंतरही कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरवण्यात आली नव्हती, हे या दुर्घनेनंतर समोर आले आहे. मजुरांचा जीव धोक्यात घालून काम सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Chembur Building Accident
Mumbai Vijaydurg Ro Ro Service: मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा : सहा तासांत कोकणात पोहोचण्याची सोय; पण दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

यांच्यावर गुन्हा दाखल

याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी मुख्य ठेकेदार मनीभाई भानजी पटेल (62), त्याचे काम पाहणारे सतीश मनीभाई पटेल (40), जितेश मनीभाई पटेल (36), साईट इंजिनियर रजनेश शामलाल चौरसिया (30) साईट सुपरवायझर सुभाष हनुमंता बगल (36), लेबर मुकादम बुधवा रतो राय (50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र बिल्डर आदित्यराज याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news