Mumbai Municipal Corporation  Pudhari
मुंबई

Mumbai Municipal Council Seating: मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवकांची दाटीवाटी; अधिकारी आणि पत्रकारांसाठी नवा पर्याय

सध्या 232 नगरसेवकांसाठी जागा अपुरी, मोठ्या सभागृहाचा प्रस्ताव अजून कागदावरही नाही, पालिका प्रशासनाला नवीन व्यवस्था शोधावी लागणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अगोदरच नगरसेवकांसाठी अपुरे पडणाऱ्या महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आता नव्या नगरसेवकांना दाटीवाटीने बसावे लागणार आहे. त्यामुळे सभागृह सुरू असताना अपुऱ्या जागेवर पर्याय म्हणून अधिकारी व पत्रकारांसाठी महापालिकेला स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. नगरसेवकांची संख्या अजून पाचने वाढणार असून सभागृहात 232 नगरसेवक सभागृहात बसणार आहेत.

अगोदरच नगरसेवकांना सभागृहातील आसने कमी पडत असताना, आता नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यामुळे दाटीवाटीने बसावे लागणार आहे. त्यामुळे अधिकारी व पत्रकारांना सभागृहात बसायला जागाच उरणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाला नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

नवीन सभागृहाचा पर्याय कागदावर आलाच नाही

सभागृह अपुरे पडत असल्यामुळे मोठे सभागृह बांधण्याचा विचार मुंबई महापालिकेचा होता. यासाठी मुंबई शहर अथवा मुंबईच्या मध्यवर्ती भागात जागा शोधून मोठे सभागृह उभारण्यात येणार होते. मात्र, हा प्रस्ताव कागदावर आलाच नाही.

अशी वाढत गेली सदस्य संख्या

140 वर्षांपूर्वी करण्यात आली मुंबई महानगरपालिका सभागृहाची निर्मिती

64 सदस्यांसह झाली होती सुरुवातीला महापालिकेची रीतसर स्थापना

1963 मध्ये नगरसेवकांची संख्या वाढून 140 इतकी झाली

1985 मध्ये नगरसेवकांची संख्या 170 वर पोहोचली

1991 मध्ये नगरसेवकांची संख्या वाढून 221 झाली

2002 मध्ये नगरसेवकांची संख्या 227 इतकी झाली

सध्या सभागृहात227 निवडून आलेले, 5 नामनिर्देशित नगरसेवक असे एकूण 232 नगरसेवक उपस्थित असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT