दरड कोसळली 
मुंबई

मुंबई : चेंबूरमध्ये घरावर दरड कोसळली; २ जण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

निलेश पोतदार

कुर्ला ; पुढारी वृत्‍तसेवा चेंबूरच्या आरसीएफ न्यू भारत नगर या डोंगराळ झोपडपट्टीमध्ये दरड कोसळली. आज (रविवार) पहाटे ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्‍ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अरविंद अशोक प्रजापती (२५) आणि आशिष अशोक प्रजापती (२०) हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत.

न्यू भारत नगर या ठिकाणच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. दरवर्षी इथे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. इथल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस पालिका देत असते. मात्र आता मुंबईत पाऊस दाखल झाला असतानाही या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणत धोकादायक स्थिती मध्ये रहातच आहेत. त्‍यामुळे या ठिकाणची स्थिती आणखी धोकादायक झाली आहे.

आज पहाटे प्रजापती कुटुंब गाढ झोपेत असताना डोंगरावरून दरड कोसळली. यातील एक मोठा दगड थेट त्यांच्या घरावर येऊन आदळला तो भिंती तोडून थेट घरात आला. घरात आत मधील खोलीत इतर कुटुंब आणि डोंगराकडे असलेल्या भागातील खोलीत भाऊ झोपले होते ते जखमी झाले. या घटनेमुळे आजूबाजूला गोंधळ उडाला. स्थानिकांनी जखमींना सायन येथील पालिकेच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलीस, अग्निशमन दल, पालिकेचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष माऊली थोरवे आणि इतर पदाधिकारी ही घटनास्थळी मदतकार्यास दाखल झाले.  या बाबत मनसेचे माऊली थोरवे म्हणाले की" दरवर्षी प्रशासन इथल्या रहिवाश्यांना घरे सोडण्याची या काळात नोटीस देते. मात्र त्यांच्या रहाण्याची व्यवस्था करीत नाही. आमची प्रशासनाला विनंती आहे की इथले जीव वाचावे म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी म्हाडाच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात यावे. अथवा मनसेतर्फे आम्ही या मुद्द्यावर तीव्र आंदोलन करू" या घटनेनंतर या डोंगराळ झोपडपट्टी मधील रहिवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या बाबत प्रशासन कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT