India USA Trade Deal Pakistan pudhari photo
मुंबई

India USA Trade Deal Pakistan: आदर विकत घेता येत नाही! भारत-अमेरिका व्यापार करार होताच पाकिस्तान गोची झाली; देशातूनच...

Anirudha Sankpal

India USA Trade Deal Pakistan: भारत आणि अमेरिकेत नुकतेच व्यापार करार झाला आहे. अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ कमी करत तो १८ टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकार हा भारताच्या डिप्लोमसीचा विजय असल्याचे सांगत आहे. दुसरीकडं भारतानं अमेरिकेसोबत ट्रेड डील डन करताच शेजारी पाकिस्तान चांगलाच अस्वस्थ झाला आहे.

पाकिस्तानचा जळफळाट

पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा अशी जाहीर मागणी केली होती. त्यांनी यासाठी त्यांना पाठिंबा देखील दर्शवला होता. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान दोघेही अमेरिकेच्या अनेक फेऱ्या मारत होते. आता मात्र याचा फार थोडा फायदा झाल्याची टीका पाकिस्तानातूनच होत आहे.

सरकारची उडवली खिल्ली

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प भारतावर खूप दबाव टाकत होते. मात्र भारतानं माघार न घेता यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपलं काम केलं. याचं आता चांगलं फळ मिळत असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. दुसरीकडं पाकिस्तानमधूनच त्यांच्या सरकारवर टीका केली जात आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारीची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. पाकिस्तानमधील एक्स युजर उमर अली ट्विट करतात, 'आपल्या फिल्ड मार्शलला डोनाल्ड ट्रम्प हे मोलकरणीसारखं वागवत होते. ही मोलकरीण आपल्या प्रेमीसाठी सगळ्या बेकायदेशीर आणि घाणेरडं काम करते. ज्यावेळी या मोलकरणीला काही देण्याचं वेळी येते त्यावेळी ती मी माझ्या कुटुंबाचा निर्णयाचं पालन करणार आहे मला विसरून जा असं म्हणते.'

दुसरीकडं तेहरीक-ए- इन्साफ (PTI) चे माजी मंत्री हमाद अझर यांनी हा पाकिस्तानच्या रणनितीचा पराभव असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, '२१ व्या शतकात परराष्ट्र धोरणात वैयक्तिक नातेसंबंध महत्वाचे नसून आर्थिक स्थैर्य आणि शक्ती महत्वाची आहे. टॅरिफ, मार्केटची उपलब्धता या गोष्टी महत्वाच्या आहेत. भारताने नुकतेच युरोपियन युनियनसोबत डील केली. त्यांनी अमेरिकेला त्यांचे महत्व किती आहे हे दाखवून दिलं. लाळघोटेपणा आणि फोटो शूट हे काही उपयोगाचं नाही.'

आदर कसा विकत घेणार?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा २ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ हे १८ टक्क्यांवर आणलं आहे. पाकिस्तानवर १९ टक्के टॅरिफ लागू आहे. त्यामुळं पाकिस्तान सरकारावर देशांतूनच टीका होत आहे.

पत्रकार इम्रान रियाझ खान यांनी लॉबिंगवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'द सेल्समन इन चीफ रणनिती फेल गेली आहे. तुम्ही बलुचिस्तानमधील खनिजे लाकडी बॉक्समधून दिली. मात्र तुम्ही आदर विकत घेऊ शकला नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT