

Parth Pawar मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवले जाते आम्ही सगळे पुरावे दिले आहेत. असा दावाही दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी या प्रकरणातील काही कागदपत्रे समोर आणली आहेत. यामध्ये पार्थ पवार व शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेल्यास पॉवर ऑफ ॲटर्नी शी संबधित दस्ताऐवज समोर आणले आहेत. पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया व वियज कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.
या बाबत पुढे त्या म्हणाले या प्रकरणात दिग्वीजय पाटील व शीतल तेजवाणी यांचीच चौकशी होत आहे तर पार्थ पवार यांची मात्र चौकशी होत नाही. जी कागदपत्रे आम्ही सादर केली आहेत. ती दिग्वीजय पाटील व शितल तेजवानींचे वकील तृप्ता ठाकूर यांनीच बाहेर काढली आहेत. असा दावा दमानिया यांनी केला. तसेच डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशनचे आयुक्त संतोष हिंगण व तृप्ता ठाकूर यांचे व्हाटसॲप चॅटही समोर आले आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे
या सर्वांना बोलावून चौकशी करावी अशी मागणी आणि केली आहे अन्यथा कोर्टात जाणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. कायदा सर्वांना समान असतो ही फक्त आपण ऐकलं असतं कारण कायदा सर्वांना समान नाही हे यावरून दिसतं दिग्विजय पाटलाची मोघम चौकशी सुरू आहे. त्यामुळे यात सगळेच दोषी लोकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे
कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत. - विजय कुंभार
आम्ही आज न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पार्थ पवार आणि इतर विषयाची कागदपत्रे आणि पोलिसांना दिली आहेत आणि या न्यायालयाच्या निर्णयानुसार गुन्हा दाखल करा असं म्हटलं आहे. अशी माहिती विजय कुंभार यांनी दिली.
पुढे बोलताना कुंभार म्हणाले की आम्ही विचारणा केल्यानंतर पोलीस म्हणतात फक्त आम्ही महसूल बुडवला त्याची चौकशी करतो. महसूल विभाग म्हणतो आम्ही जमिनीची चौकशी करतो. अशा वेगवेळ्या चौकशी करण्यापेक्षा तर आमची मागणी आहे की हे सगळे गुन्हे एकत्र करून चौकशी करा. असेच सगळे सुरू राहिला तर या प्रकरणात विलंब होईल व दोषी कधीच सापडणार नाहीत. त्यामुळे दोषींवर कारवाई होण्यासाठी लवकर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कुंभार यांनी त्यांच्या एक्स् अकाऊंटवर दस्ताचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यामध्ये शिजल तेजवानी व पार्थ पवार यांची नावे आहेत.