निवडणुकीतील पैसे वाटपावरून मारहाण Pudhari News network
मुंबई

Dombivli Election Violence: मतदानाआधीच डोंबिवलीत रक्तरंजीत राडा! पैसे वाटपावरून भाजपा-शिंदे सेनेत हिंसाचार

कोयत्यांचा वापर केल्याचे आरोप; तिघेजण जखमी, परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करून पोलिसांचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच डोंबिवलीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांवरून जोरदार धुमश्चक्री झाली. या राड्यात कोयत्यांचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले असून हिंसाचारात तिघेजण जखमी झाले आहे. एकीकडे पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.

सोमवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास भगतवाडी भागात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार नितीन मट्या पाटील, रवी मट्या पाटील आणि इतर आठ जणांनी भाजपाच्या महिला उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकर (47) यांच्यावर हत्याराने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 29 मधील शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी मात्र आपल्यासह आपले बंधू, मुले आणि कार्यकर्त्यांवर दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. आपण हल्ला केलाच नाही, असे सांगून गुन्ह्यातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.नितीन पाटील यांनी त्यांच्या सदऱ्यातून धारदार हत्यार बाहेर काढून आपल्या डोक्यावर हल्ला चढविला.

यात आपण गंभीर जखमी झालो. तर रवी पाटील यांनी आपल्यावर लोखंडी सळईने हल्ला केला. त्याच वेळी नितीन पाटील आणि रवी पाटील यांची मुले आणि इतर कार्यकर्त्यांनी आमच्यावर लाथा-बुक्क्यांनी, तसेच बांबूच्या साह्याने हल्ला चढविला. आपल्या बचावासाठी आलेल्या प्रदीप सागवेकर आणि अनुप शेलार यांनाही मारहाण करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT