मुंबई: इंडियन पेपर कोरुगेटेड अँड पॅकेजिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ICPMA) आणि फ्युचरेक्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो ची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे. हे भव्य प्रदर्शन १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान हॉल क्रमांक ६, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे.
कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरी क्षेत्रासाठी भारतातील हे एकमेव विशेष प्रदर्शन आहे. २०२४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आवृत्तीच्या यशानंतर यावर्षी पुन्हा या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अत्याधुनिक मशिनरींचे लाईव्ह डेमो, नॉलेज सेशन्स आणि भारतासह परदेशातील अव्वल ब्रँड्सशी नेटवर्किंग ही या वर्षीच्या प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे असतील.
कोरू पॅक प्रिंट इंडिया हे असे व्यासपीठ आहे, जिथे उद्योगातील अग्रगण्य कंपन्या नवीन तंत्रज्ञान, पुढील पिढीची मशिनरी तसेच टिकाऊ आणि किफायतशीर उपाय सादर करणार आहेत. कोरुगेशन आणि पॅकेजिंग क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या गरजा लक्षात घेता हा एक्स्पो उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
२०२६ मधील या एक्स्पोमध्ये २५० हून अधिक मशिनरी आणि टेक्नॉलॉजी पुरवठादार सहभागी होणार आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचाही सहभाग अपेक्षित आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला सुमारे १५ हजारांहून अधिक व्यावसायिक भेट देण्याची शक्यता आहे.
या प्रदर्शनात बॉक्स तयार करणाऱ्या मशिन्स, प्रिंटिंग आणि लॅमिनेशन सोल्यूशन्स, रिजिड बॉक्स आणि कार्टन उत्पादन मशिनरी, टेस्टिंग उपकरणे, शाई, अॅडहेसिव्ह्ज, क्राफ्ट पेपर तसेच इतर अनेक आधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे.
भारतातील पॅकेजिंग उद्योगाचे मूल्य सध्या सुमारे ७५ अब्ज डॉलर्स असून तो दरवर्षी १८ ते २० टक्के दराने वाढत आहे. २०२६ पर्यंत हा उद्योग सुमारे २५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वाढीत कोरुगेटेड आणि पेपर पॅकेजिंग क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
आईसीपीएमएचे अध्यक्ष निकेत डी. शाह, एक्झिबिशन कमिटीचे सदस्य हितेश नागपाल, रौनकसिंह भुरजी, मनीष सुरेश शाह तसेच फ्युचरेक्स ग्रुपचे डायरेक्टर नमित गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर स्वामी प्रेम अन्वेषी आणि डायरेक्टर निधी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा एक्स्पो आयोजित केला जात आहे. कोरू पॅक प्रिंट इंडिया हा भारतातील कोरुगेटेड पॅकेजिंग मशिनरीसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म बनला आहे.
आईसीपीएमएचे अध्यक्ष निकेत डी. शाह म्हणाले, “पहिल्या आवृत्तीच्या मोठ्या यशामुळे उद्योगाला अशा विशेष प्लॅटफॉर्मची गरज असल्याचे स्पष्ट झाले. कोरू पॅक प्रिंट इंडिया मध्ये यावेळी तीनपट मोठ्या प्रमाणावर मशिनरी, कच्चा माल आणि बॉयलर्स एकाच छताखाली आणले जात आहेत. हा केवळ एक्स्पो नसून कोरुगेटेड पॅकेजिंग उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
फ्युचरेक्स ग्रुपचे डायरेक्टर नमित गुप्ता म्हणाले, “हा एक्स्पो म्हणजे नवकल्पना आणि व्यवसायिक दृष्टीकोन यांचा संगम आहे. येथे उद्योगातील अग्रगण्य व्यक्ती एकत्र येऊन सहकार्य, नवीन तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन व्यवसायिक संधींची चर्चा करतील.”
२०२४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आवृत्तीमुळे कोरू पॅक प्रिंट इंडिया उद्योगासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पुढे आले. या प्रदर्शनामुळे सप्लायर्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि उद्योगातील निर्णय घेणारे अधिकारी एकाच मंचावर आले आणि अनेक व्यवसायिक करार व भागीदारी निर्माण झाल्या.
२०२६ मधील आवृत्ती या यशाला आणखी बळ देणार आहे. भारतासह परदेशातील वरिष्ठ अधिकारी, प्लांट मॅनेजर्स, खरेदी प्रमुख आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. २५० हून अधिक मशिन्सचे लाईव्ह प्रदर्शन असल्यामुळे हा एक्स्पो उद्योगासाठी अनुभव, नेटवर्किंग आणि व्यवसायिक करारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
फेडरेशन ऑफ कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स (FCBM) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग यांसारख्या संस्थांचेही या कार्यक्रमाला पाठबळ आहे. त्यामुळे उद्योगाला ज्ञान, नेटवर्किंग आणि भविष्यातील दिशा यांचा मजबूत संगम या एक्स्पोमधून मिळणार आहे.