मुंबई

मुंबईकर पुन्हा वेठीस ९ डेपोतील बेस्टची वाहतूक ठप्प

अमृता चौगुले

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पगार वाढीसह इतर मागण्यासाठी बेस्टमधील कंत्राटी चालकानी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. तब्बल नऊ डेपोमधून एकही बस बाहेर पडू शकली नसल्याने सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकराचे हाल झाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत 921 बस डेपो बाहेर पडल्या नाहीत.सुमारे 500 कंत्राटी चालकांनी आंदोलनात भाग घेतला आहे.

बुधवारी घाटकोपर, मुलुंड या दोन डेपो मध्ये सुरु झालेले कंत्राटी चालकाचे काम बंद आंदोलन गुरुवारी पहाटे पासून सुरु राहिले. गुरुवारी हे आंदोलन बेस्टच्या नऊ डेपोमध्ये सुरु झाले. त्यात घाटकोपर, मुलुंड, मसाज आणि पूर्व उपनगरातील डेपोचा प्रमुख्याने समावेश आहे. डेपोतून बस बाहेर पडत नसल्याने प्रवाशाच्या बस स्टॉप वर रांगा लागल्या होत्या.

बराच वेळ बसची वाट पाहून शेवटी प्रवासशानी टॅक्सी, रिक्षाने प्रवास केला. परंतु प्रवाशाची अडचनीचा गैरफायदा टॅक्सी रिकशा चालकानी घेत भाडे जास्त आकारले. काम बंद आंदोलनामुळे वरळी, प्रतिक्षनागर, आणिक, धारावी, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रुज , गोराई, मागाठाणे या आगारातील बस गाड्या प्रभावित झाल्या आहे. काम बंद आंदोलनामुळे वरळी, प्रतिक्षनागर, आणिक, धारावी, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, गोराई, मागाठाणे या आगारातील बस गाड्या प्रभावित झाले आहेत.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT