मुंबई

Maharashtra Bandh : मारहाणीच्‍या घटनांचे काँग्रेस कधीच समर्थन करणार नाही : नाना पटोले

नंदू लटके

भाजपकडून शेतकर्‍यांवर अन्‍याय होत आहे. यामुळेच जनतेने महाराष्‍ट्र बंदला   ( Maharashtra Bandh : ) चांगला प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मारहाणीच्‍या घटना घडल्‍या असतील मात्र अशा घटनांचे काँग्रेस कधीच समर्थन करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी आज स्‍पष्‍ट केले.

लखीमपूरमधील शेतकरी आंदोलनावेळी झालेल्‍या हिंसाचाराच्‍या निषेधार्थ शिवसेना, राष्‍ट्रवादी आणि काँग्रेस्‍यचा वतीने आज महाराष्‍ट्र बंदची ( Maharashtra Bandh : ) हाक देण्‍यात आली होती. सकाळपासूनच तिन्‍हे पक्षांचे पदाधिकारी बंदची हाक देत होते. सायंकाळी बंद संपला. यानंतर माध्‍यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी बंदला प्रतिसाद दिल्‍याबद्‍दल महाराष्‍ट्रातील जनतेचे आभार मानले.

यावेळी पटोले म्‍हणाले, आज आम्‍ही भाजप सरकारच्‍या शेतकरी विरोधी धोरणाच्‍या निषेधार्थ मूक आंदोलन केले. बंदमध्‍ये काही जिल्‍ह्यांमध्‍ये मारहणाीची घटना घडल्‍या असतीलही मात्र काँग्रेस अशा घटनांचे कधीच समर्थन करणार नाही. हे बंद आंदोलन राज्‍य सरकारचे नव्‍हते. मात्र या बंदला राज्‍य सरकारने पाठिंबा दिला होता. मात्र भाजपकडून चुकीचे आरोप करण्‍यात आले. महाराष्‍ट्रातील जनतेने बंदला दिलेला प्रतिसादाबद्‍दल महाराष्‍ट्रातील जनतेला ध्‍यनवाद, असेही ते म्‍हणाले.

लखीमपूर घटनेतील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र हे भाजपविरोधी राज्ये आहेत. या राज्यातचं अशी परिस्थिती निर्माण झालीय. दबावतंत्र आम्ही मान्य करणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT