मुंबई

चंद्रकांत पाटील यांनी विचार करून बोलावे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्य महिला आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याबाबतचा खुलासा दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा याबाबत खुलासा प्राप्त झाला असून, त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच सुप्रिया सुळे व समस्त महिलांची दिलगिरी व्यक्त केली आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे, तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी, अशी समज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली असल्याचेही चाकणकर यावेळी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहित सुप्रिया सुळे यांच्यबाबत केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात स्वयंसिद्धा, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रदिवस काम केले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी. ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत.

सुप्रियाताईबद्दल, महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दुःख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनीना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT