IPL Final GT vs RR : आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कोण? जाणून घ्या, नियम काय सांगतात! | पुढारी

IPL Final GT vs RR : आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर विजेता कोण? जाणून घ्या, नियम काय सांगतात!

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाचा आयपीएलचा मोसम जबरदस्त ठरला. या मोसमात पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने हंगामाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. २००८ साली झालेल्या पहिल्या हंगामामध्ये राजस्थानने शेन वॉर्नच्या नेतृत्वामध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.(IPL Final GT vs RR)

यंदाचा आयपीएल २०२२ सालचा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरूध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमादाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियम पूर्ण क्षमतेने पाहण्याची परवानगी  मिळाली आहे. अंतिम सामन्याची सर्व तिकिटेही बुक झाली आहेत. अशा परिस्थितीत पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास तर, त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.(IPL Final GT vs RR)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने या हंगामात जबरदस्त कामगिरी करत पहिल्याच हंगामात इथपर्यंत मजल मारली आहे. यासोबतच राजस्थानचा संघही खूप मजबूत संघ आहे आणि संघात अनेक मॅचविनर खेळाडूही आहेत; पण क्रिकेट चाहत्यांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. सामन्यात पाऊस पडला तर काय होईल, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कोणत्या संघाला विजेता घोषित केले जाईल? या प्रश्नाबाबत अनेक शंका आहेत. येथे आपण पाहणार आहोत की आयपीएलचे नियम काय सांगतात?

गुजरात आणि राजस्थान यांच्यात होणारा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. येथे प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने सामना पाहण्याची परवानगी मिळाली आहे. अंतिम सामन्याची सर्व तिकिटेही बुक झाली आहेत. अशा परिस्थितीत पाऊस पडला तर त्यासाठी सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तुम्हाला आठवत असेल की वर्ल्डकपमध्ये आपल्याला असाच एक सामना पाहायला मिळाला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसात वाहून गेल्याने हा राखीव दिवशी खेळवण्यात आला होता. परंतु नियमानुसार राखीव दिवशी सामना खेळवणे हा अंतिम पर्याय आहे. या आधीही अनेक नियम आहेत.

… तर सामना होणार राखीव दिवशी

नियमांनुसार पावसामुळे सामन्यास उशीर झाला तर रात्री ९.२० पर्यंत सामना सुरू करता येईल. पाऊस सुरू राहिला तर ५-५ षटकांचा सामना खेळवला जाईल. पावसामुळे रात्री १२.५० पर्यंतही सामना सुरू होऊ शकला नाही, तर अशा परिस्थितीत सामना सुपर ओव्हरवर खेळवण्यात येईल. तरीही,संततधार पावसामुळे हे शक्य झाले नाही, तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल. अशा स्थितीत गुजरात आणि राजस्थानचा संघ राखीव दिवशी सामना खेळणार आहे. अंतिम सामना असल्याने त्यानंतरच विजय-पराजय निश्चित होईल.

Back to top button