Central Railway Power Block pudhari photo
मुंबई

Central Railway Power Block: मध्य रेल्वेचा शनिवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक; अनेक मेमू गाड्या रद्द, 24 अतिरिक्त होळी स्पेशल जाहीर

खारबांव येथे नव्या मालगाडी मार्गासाठी 7 तासांचा ब्लॉक; मेल-एक्स्प्रेस 30 मिनिटांपर्यंत उशिराने धावणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेकडून खारबांव येथे शनिवार- रविवार विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवीन अप आणि डाऊन मालगाडी मार्ग सुरू करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 00.30 वाजल्यापासून ते रविवार 22 फेब्रुवारीच्या सकाळी 07.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.

रद्द केल्या जाणाऱ्या गाड्या डाऊन गाड्या

21 फेब्रुवारी : पनवेल- डहाणू रोड मेमू

21 फेब्रुवारी : दिवा-वसई मेमू

22 फेब्रुवारी : डोंबिवली सेंट्रल केबिन-बोईसर मेमू

अप गाड्या

21 फेब्रुवारी : वसई रोड- दिवा मेमू

21 फेब्रुवारी : वसई रोड-पनवेल मेमू

22 फेब्रुवारी : बोईसर-वसई रोड मेमू

22 फेब्रुवारी : वसई रोड-दिवा मेमू

गाड्यांचे नियमन

21 फेब्रुवारीला सुटणारी डहाणू रोड- पनवेल मेमू कामन रोडवर 10 मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

21 फेब्रुवारीला सुटणारी सिकंदराबाद - राजकोट एक्स्प्रेस भिवंडी रोडवर 1 तास 30 मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

ब्लॉक काळात या मार्गावरुन जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.

मरेकडून होळीनिमित्त 24 अतिरिक्त विशेष गाड्या

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-कानपूर आणि पुणे/हडपसर-झांसी दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन 24 अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालवणार आहे.

मध्य रेल्वेने यापूर्वी 216 होळी विशेष गाड्यांची घोषणा केली होती. यामध्ये 186 होळी विशेष आणि 30 अतिरिक्त होळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. आज पुन्हा जाहीर केलेल्या या 24 अतिरिक्त होळी विशेष गाड्यांच्या संख्येसह 240 गाड्या चालविण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT