Arrested Pudhari
मुंबई

42 Years Absconding Arrested: ४२ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; भायखळा पोलिसांची मोठी कामगिरी

1984 पासून प्रलंबित स्टँडिंग वॉरंटवर कारवाई; मुंबई पोलीसांच्या विशेष मोहिमेत आरोपीला अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भायखळा पोलीस ठाणे अभिलेखावरील ४२ वर्षापासून फरार असलेला आरोपीला अटक करण्यास पोलीसांना यश आले. मोहम्मद उर्फ सलीम अब्दुल दोराजीवाला (सत्तार), असे त्यांचे नाव असून तो सलीम मेन्शन, प्लॉट क. 64, 4 था माळा, माझगाव येथे वास्तव्याला होता.

आरोपी नामे मोहमद उर्फ सलीम अब्दुल दोरजीवाला व आरोपी नामे इब्राहीम मालवला यांनी कंट्री देशी दारूचा अड्डा जीएसटी भवन, पेट्रोल पंप, माझगाव, मुंबई येथे दारू पिऊन फिर्यादी सदानंद शेट्टी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाल्याने आरोपीने फिर्यादीच्या पोटामध्ये चाकू भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायालयात चालू होती. आरोपीस सन 1984 मध्ये जामीन झाल्यानंतर तो न्यायालयात सुनावणी कामी हजार न राहिल्याने न्यायालयाने त्याच्यावर स्टॅंडिंग वॉरंट काढले होते. सदरचे स्टॅंडिंग वॉरंट बजावली कामी पोलीस ठाण्यास प्राप्त झाले होते. मात्र आरोपी फरार असल्याने पोलीसांची पंचायत झाली होती. 

विशेष मोहिमेअंतर्गत भायखळा पोलीस ठाणे येथील प्रलंबित स्टँडिंग अजामीनपात्र वॉरंट बजावणी कामी

आरोपी याचा शोध सुरु असतांना प्रयत्न, तो ओरिसा, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे काही दिवस मच्छी विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती,

त्यानंतर काही दिवसापूर्वी सदरचा आरोपी हा मुंबईत आला असल्याची खात्रीलायक माहिती भायखळा पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून आरोपीच्या पूर्वीच्या पत्त्यावर राहत नसून तो पायधुनी परिसरातुन अफझल माऊ हॉटेल, परब चौक, भायखळा (पू), मुंबई येथे येणार असल्याबाबत माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळाली, त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस पथकाने साध्या गणवेशात सापळा रचुन आरोपी सदर ठिकाण्याहून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT