Sports Grounds Toilet: राज्यातील क्रीडा मैदानांचे गुगल मॅपिंग सुरू; मैदानांवर महिला खेळाडूंसाठी शौचालय व चेंजिंग रूमसाठी एसआयटीची स्थापना

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानपरिषदेत माहिती
Sports Grounds Toilet
Sports Grounds ToiletPudhari
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील विविध मैदानांवर खेळणाऱ्या मुलींसाठी शौचालय व चेंजिंग रूमच्या अभावामुळे गैरसोय होत आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

Sports Grounds Toilet
MBA MCA CET 2026: एमबीए-एमसीए सीईटीसाठी विक्रमी प्रतिसाद; 1.80 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील क्रीडा मैदानांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत शिवसेना (ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. आमदार निधी देऊन ही स्वच्छतागृहे उभारली जात नाहीत, अशी खंत व्यक्त करत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नार्वेकर यांनी केली. या प्रश्नाच्या चर्चेत चित्रा वाघ, ॲड.अनिल परब, प्रविण दरेकर यांनी सहभाग घेत खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

Sports Grounds Toilet
Mumbai Goa Highway Update: मुंबई-गोवा महामार्गाला अखेर वेग; मे 2026 पर्यंत बहुतांश कामे पूर्ण होणार

मैदानांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत लोकायुक्तांच्या निर्देशानुसार ८ जानेवारी २०२५ रोजी विशेष चौकशी पथकाची अधिकृत स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व मैदाने व क्रीडा संकुलांचे गुगल मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. संबंधित मैदानांवरील विद्यमान सुविधा, आवश्यक सोयीसुविधा, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमानुसार २ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या मैदानांवर स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे.

Sports Grounds Toilet
HPV Vaccination Mumbai: मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात; 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण

मात्र, ओव्हल मैदान संदर्भात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या मैदानांवर कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच एका मैदानासंदर्भातील निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील सर्व मैदानांना लागू होतो का, याबाबत एसआयटीला विधी विभागाकडून स्पष्ट मत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sports Grounds Toilet
Daivi Sampatti in Dnyaneshwari: अपैशुन, दया, अलोलुप्त आणि मार्दव : दैवी संपत्तीतील जीवनाला उन्नत करणारे चार रत्न

चेंगिग रूमसाठी कंटेनरचा पर्याय

दरम्यान, मैदानावर शौचालय व चेजिंग रुमसाठी कंटेनरचा पर्याय आहे. त्यामुळे पुढील काळात मैदानावर कायमस्वरूपी बांधकाम शक्य नसल्यास कंटेनरच्या माध्यमातून तात्पुरती शौचालय व चेंजिंग रूम उभारण्याचा पर्यायही विचारात घेतला जाईल, असे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news