Friend Abuse Assault Pudhari
मुंबई

Bhiwandi Sexual Assault Case: भिवंडीत 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार; खासगी फोटो-व्हिडीओ व्हायरल

मैत्रीचा गैरफायदा घेत बदनामी; तरुणाविरोधात नारपोली पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : 23 वर्षीय तरुणीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून 26 वर्षीय तरुणाने मैत्रिणीवर जबरीने अत्याचार करून दोघांचे खासगी व्हीडिओ व फोटो व्हॉट्सॲपवर नातेवाईकांमध्ये तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल करून तरुणीची समाजात बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी मित्राच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल गौतम (26) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीशी मैत्री करून त्यानंतर 16 जून 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत पीडितेवर अत्याचार केले आहेत. तसेच दोघाजणांचे खासगी फोटो व व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला देत पीडितेच्या नावाने व्हॉट्सॲपवर ग्रुप बनवून त्यात पीडितेच्या नातेवाईकांना ॲड करून तसेच सोशल मीडियावर आयडी बनवून दोघांचे खासगी फोटो व व्हीडिओ प्रसारित करून पीडितेची बदनामी केली आहे.

या प्रकरणी सदर बाब ही पीडितेच्या लक्षात येताच पीडितेने नारपोली पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT