परभणी, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमीत्त तब्बल दोन वर्षांनंतर विविध ठिकाणांहून दिंड्या रवाना होऊ लागल्या आहेत. शेगावच्या संत गजानन महाराज व संत गुलाबराव महाराज यांच्या पालखीचे आगमन सोमवारी (दि.20) सकाळी शहरात झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण वसमत रस्त्यावर दर्शनासाठी भाविक उपस्थित होते. वारकरी संप्रदायाची पताका घेऊन सहभागी झालेल्या वारकर्यांनी हरिनामाचा गजर करीत मोठी वातावरण निर्मिती केली. शेगावच्या संत गजानन महाराज पालखीच्या नियोजन दौर्याप्रमाणे रविवारी रात्री हिंगोली जिल्ह्यातून ही पालखी झिरो फाटा येथे जिल्ह्यात दाखल झाली. भारती कॅम्प येथे मुक्कामानंतर पहाटेच ही पालखी परभणी शहरात दाखल झाली.
वसमत रोडवर ठिकठिकाणी भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यानंतर दहाच्या सुमारास ही पालखी शिवराम नगरातील संत तुकाराम महाराज मंदिर, कडूबाईचा मळा येथे दाखल झाली. या ठिकाणी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी शहरातून ही पालखी नवा मोंढा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर मुक्कामासाठी दाखल झाली. दिवसभरात हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करीत दर्शन घेतले. पालखी मार्गाहून ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, पुष्पवृष्टी करण्याबरोबरच महिलांनी पालखीचे स्वागत करीत दर्शन घेतले. विविध संस्था, संघटना व भाविकांनी वारकर्यांच्या सेवेसाठी विविध प्रकारच्या सेवा ज्यामध्ये अल्पोपहार, पाणी, चहा यासह भोजनाची व्यवस्था केली होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालखी व दिंड्यांवर प्रतिबंध आले होते. मात्र यंदा पालख्या निघणारच हे निश्चीत होते. त्या दृष्टीने वारकरी संप्रदायाने जय्यत तयारी करीत दिंड्यांच्या कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. दिंड्यांचे स्वागत करण्यासाठी व दर्शनासाठी झालेली गर्दीत मोठा उत्साह होता.
कचरा डेपोचा राजकीय स्टंट स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिका दुसर्या क्रमांकावर आहे. मात्र कचरा टाकण्यासाठी कचरा डेपो उपलब्ध नाही. स्वच्छतेसाठी 130 कामगार तर महिन्याकाठी 19 लाख पालिका खर्च करते, मात्र कचरा डेपोचा प्रश्न तत्कालिन नगराध्यक्षांनी सोडवला नाही तर उलट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला. सत्तेत असताना काहीच न करता आता कचरा डेपो हटविण्याची मागणी करणे हा केवळ राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक रहिम खाँ पठाण यांनी दिली. चांदूरबाजारच्या दिंडीस महाप्रसाद गेल्या अनेक वर्षांची दिंडीची परंपरा असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील श्री संत गुलाबराव महाराज यांची दिंडी 3 जूनपासून पंढरपूरसाठी निघाली असून तिचे आगमन सोमवारी श्रीक्षेत्र त्रिधारा व त्यानंतर परभणीत संत तुकाराम महाविद्यालयात झाले.
याठिकाणी संत गुलाबराव महाराजांच्या पादुकांचे पूजन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापूजा व आरती करण्यात आली. अॅड. (कै.) शेषराव भरोसे यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी या दिंडीतील वारकर्यांसाठी सुरू केलेली महाप्रसादाची परंपरा याही वर्षी भरोसे परिवाराने जोपासली. यावेळी कस्तुरबाई भरोसे, शिवाजी भरोसे, सुंदरराव भरोसे, बबनराव भरोसे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
हेही वाचलंत का?