मराठवाडा

ईसापूर धरण भूकंप मापक यंत्रणा १७ वर्षापासुन बंदच!     

backup backup

उमरखेड; प्रशांत भागवत : पैनगंगा नदीवरील ईसापूर धरण भूकंप मापक यंत्रणा बसविण्यात आले होते. मात्र गेल्या सतरा वर्षापासून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ईसापूर धरण परिसरातील भूकंप मापक यंत्र आणि प्रयोग शाळा बंद पडली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

उमरखेड व महागाव तालुक्‍यात तसेच लगतच्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील काही भागात रविवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. विदर्भ – मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरण बांधण्यात आले आहे. ईसापूर धरण आवक १९९० मध्ये पाटबंधारे विभागाने भूकंप मापक यंत्र उभारली होती.

अधिक वाचा :

जपानवरुन आणले होते यंत्र

त्यावेळी यासाठी पाच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तेथे एक वास्तू बांधण्यात आली त्यामध्ये भूकंप मापक यंत्र बसविले. हे यंत्र थेट जपानमधून आणण्यात आले होते. भारतासह जगातील भूकंपाच्या नोंदी या यंत्रावर घेतल्या जात होत्या. जगात कुठेही भूकंप झाला तरीही त्याची नोंद या ठिकाणी केली जात होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू , तीव्रता आधीची नोंद या केंद्रावर होत होती. २४ तास सुरू राहणाऱ्या या यंत्रावर दोन रोज सकाळी विशिष्ट कागद लावून माहिती घेतली जात होती. त्यासाठी तज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

जगभरातील भूकंपाची नोंद

जपान, इंडोनेशिया आणि गुजरातमधील भुज तसेच कोयना व बीड जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची नोंद येथील यंत्राने घेतली होती. त्याचप्रमाणे मुदखेड येथील भूकंपाची नोंद ही झाली होती. पुणे येथील भूकंप मापक यंत्राच्या तोडीचे हे यंत्र आहे.

विदर्भात एकमेव असलेल्या यंत्राकडे गेल्या पंधरा वर्षापासून दुर्लक्ष झाले दरम्यान १७ वर्षांपूर्वी या यंत्रामध्ये अचानक बिघाड झाला होता. त्यानंतर हे यंत्र दुरुस्तीसाठी नाशिकला पाठविण्यात आले. त्यावेळी केवळ पंधरा हजार रुपये खर्च अपेक्षित होता.

अधिक वाचा :

भूकंप मापक यंत्रच चोरीला

मात्र त्याकडे जलसंपदा विभागाने लक्ष दिले नाही. त्यानंतर पाच – सात वर्षांपूर्वी येथील प्रयोगशाळेत चोरी झाली. त्यात बारा लाख रुपये किंमतीची यंत्रणा चोरीस गेली होती. त्या चोरीचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.

परिणामी ईसापूर धरण परिसरातील भूकंप मापक यंत्र व प्रयोगशाळा ठप्प झाली. परिणामी रविवारीसकाळी जिल्ह्याला बसलेल्या भूकंपाची नोंद येथे होऊ शकली नाही.

नवीन इमारत बांधून तयार ईसापूर धरण येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रयोगशाळेची जुनी वास्तू मोडकळीस आली होती. त्यामुळे तेथे पंधरा लाख रुपये खर्च करून नवीन वास्तू बांधण्यात आली. वास्तूमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र अद्याप भूकंप मापक यंत्राची प्रतीक्षा आहे.

हेही वाचले का?

पाहा फोटो : Earthquake : हिंगोलीसह नांदेड भूकंपाने हादरले 

[visual_portfolio id="5152"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT