मराठवाडा

संतापजनक… पतीच्या ‘तेराव्या’लाच विधवेवर अत्याचार

अविनाश सुतार

पैठण : पुढारी वृत्तसेवा: पतीच्या निधनानंतर तेराव्याचा कार्यक्रम संपवून चुलत सासूच्या घरामध्ये आराम करीत असलेल्या एका असाह्य महिलेवर अत्याचार करून जीवे मारुन टाकण्याची धमकी देण्‍यात आल्‍याचा प्रकार घडला आहे. पीडित महिलेने चुलत दिराविरोधात आज (दि.२३) फिर्याद दिली असून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील एका गावातील महिलेच्या पतीचे निधन झाले. पतीच्या तेराव्याचा कार्यक्रम संपवून पीडित महिला घरामध्ये विश्रांती घेत होती. यावेळी घरामध्ये कोणीच नसल्‍याचा फायदा घेऊन चुलत दीराने पीडितेवर अत्‍याचार केले. तसेच तिला जीवे मारण्‍याची धमकीही दिली.

या प्रकरणी  पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, पोलीस नाईक संतोष तोडकर करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT