छत्रपती संभाजीनगर : गस्‍तपथकाचे वाहन झाडावर आदळून पोलिस कर्मचारी ठार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : गस्‍तपथकाचे वाहन झाडावर आदळून पोलिस कर्मचारी ठार

वैजापूर ; पुढारी वृत्‍तसेवा गस्तपथकाचे वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात शिऊर पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी ठार झाला, तर एकजण जखमी झाला. ही घटना शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्यावर (शुक्रवार) रात्री घडली. विठ्ठल बदने (रा.शिव शंकर कॉलनी, वैजापूर) असे ठार झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर सिद्धेश्वर विधाटे हे जखमी झाले आहेत.

हरीण आडवे गेल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन झाडावर जावून आदळले. ही धडक इतक्‍या जोरात होती की जीपचा समोरील भाग पूर्णपणे चेपला. त्यात बदने यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

अडकलेले बदने हे मला बाहेर काढा, मला काहीही झालेले नाही असे म्हणत होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बदने बोलत होते. मात्र बदने यांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी सुमारे दीड तास लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होवून ते मृत पावले. तर चालक विधाटे हे जखमी असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांच्या या वाहनात शिऊर येथील एक स्थानिक पत्रकार होता. त्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button