जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर-जालना महामार्गावरील मालेगाव शिवारात गुरूवारी (दि.२) रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक शिंदे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय दाखल केले. परंतु. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील दाभा-डीग्रस येथील रहिवासी बाबुराव गोविंद घुगे ( वय ५०) व विष्णू सुभाष घुगे (वय ३४) हे दुचाकी (क्र.एम.एच. २२.ए. बी. २७२१) ने जिंतूरकडे जात होते. याच दरम्यान जिंतूर येथील देवगाव फटाकडे जाणाऱ्या बोरकीनी (ता. सेलू) येथील पांडुरंग अंबादास मुसळे (वय ४२) व सुरेश लिंबाजी मुसळे (वय ३०) दुचाकी (क्र. एम. एच. ३८. यु १२१०) येत होते. यावेळी दोन्ही मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली.
यानंतर सर्व जखमींना जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय दाखल केले. तर डॉ. खान यांनी अपघातातील विष्णू सुभाष घुगे यांना मृत घोषित केले. या अपघातातील अन्य जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जिंतूर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे.
हेही वाचलंत का?