मराठवाडा

‘सामूहिक बलात्‍कार प्रकरण फास्‍ट ट्रॅक न्यायालयात चालवणार’

निलेश पोतदार

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज (शनिवार) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पैठण तालुक्यात झालेल्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित महिलांची त्यांनी आज भेट घेतली. या घटनेबाबत त्यांनी पोलिसांकडून अधिक माहिती घेतली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील एका शेत वस्तीवर सात दरोडेखोरांनी हल्ला करत दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या घटनेनंतर राज्यभरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तर दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी दै.पुढारीशी बोलतांना सांगितले की, सर्व सातही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे.

तसेच दोन्ही अत्याचारग्रस्त पिडीतांना  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबे अजूनही दहशतीखाली आहे. त्यामुळे त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण पुरवण्यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT