winter session : नोव्हेंबर अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची शक्यता | पुढारी

winter session : नोव्हेंबर अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची शक्यता

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

कोरोना महारोगराईचा प्रकोप लक्षात घेता गतवर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन (winter session) घेता आले नव्हते. परंतु, यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने हिवाळी अधिवेशनाचा (winter session) मार्ग सुकर झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन करीत अधिवेशन भरवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अधिवेशनादरम्यान (winter session) २० बैठका होणार असून ख्रिस्मसच्या पूर्वी अधिवेशनाचे सूप वाजेल. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय तसेच पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला होता. अधिवेशनाच्या तारखांसंबंधी अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसला तरी २९ नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरु होऊन २३ डिसेंबर पर्यंत चालेल, असे बोलले जात आहे.
संसदीय कामकाज समिती तारखांसंबंधी अंतिम निर्णय लवकरच घेईल. भारतात १ अब्जांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी काहींना दोन्ही तर काहीना पहिला डोस मिळाला आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत, म्हणजे जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे, १२० कोटी भारतीयांना ही लस दिली गेलेली असेल. कोरोना संसर्गाचा धोका यामुळे कमी होणार आहे.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचलं का?

Back to top button