परभणी

परभणी: चौंडी येथे उपोषणाला बसलेले सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली

अविनाश सुतार

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: यशवंत सेनेचे संस्थापक सदस्य तथा धनगर आरक्षणा साठी उभी हयात संघर्ष करणारे ओबीसी नेते सुरेश बंडगर धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत माघार घेणार नाही, अशी आग्रही भूमिका घेत बंडगर यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.

धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. यशवंत सेनेचे नेते बाळासाहेब दोडतले, अण्णासाहेब रुपनवर यांच्या समवेत सुरेश बंडगर हे आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, उपोषणादरम्यान बाळासाहेब दोडतले, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर या तिघांचीही प्रकृती खालावली. मात्र, जोपर्यंत धनगर आरक्षणाचा वटहुकूम निघत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही व वैद्यकीय उपचारही घेणार नाही, अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी चौंडीत घेतली आहे.

दरम्यान, या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी राज्यभरासह गंगाखेड तालुक्यातील अनेक समर्थक चौंडी येथे रवाना झाले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT