मराठवाडा

परभणी : लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायद्यासाठी मानवतमध्ये हिंदूंचा भव्य मुकमोर्चा

अमृता चौगुले

मानवत(परभणी), पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद व धर्मांतरणविरोधी कायदा बनवून दोषी आढळण्यावर कठोर कायद्याची तरतूद करण्यात यावी. या मागणीसाठी मानवत शहरात आज ( दि. २५ ) धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समितीच्यावतीने हजारो जणांच्या उपस्थितीत भव्य मूकमोर्चा काढण्यात आला.

शहरातील जुने दत्त मंदिर पासून मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात धर्मध्वजाचे अनावरण संत महंतांच्या हस्ते करून करण्यात आली. लव्ह जिहाद व बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी आणून कठोर कायदा करावा, गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करावा, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून हत्यारा जिहादी आफताब पुणावाला यास फाशी द्यावी, अशी मागणी करणारे फलक मोर्चेकरांच्या हातात होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात नायब तहसीलदार यांना सर्व मागण्याचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT