मराठवाडा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिमला व्हावे म्हणून राज्यपालांना निवेदन

अमृता चौगुले

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक वर्षापासून अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशीमला व्हावे यामागणीसाठी समस्त वाशीमकर, वाशीम जिल्हा उपकेंद्र संघर्ष समिती मार्फत आपला कायदेशीर लढा देत आहेत, त्याचाच भाग म्हणून दि.१० जून रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस हे अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिमला व्हावे या मागणीचे वाशीम जिल्हा उपकेंद्र संघर्ष समितीच्या वतीने दिलीप जोशी यांनी राज्यपाल महोदयांना निवेदन दिले.

राज्यपाल महोदय यांना वाशीम जिल्ह्याची भौगोलिक स्थितीची माहिती व हे उपकेंद्र वाशीमला व्हावे व उपकेंद्रासाठी १९९६ पासून आजवर वाशीम करांचे झालेले प्रयत्न याबाबत अवगत करण्यात आले. राज्यपालांनी प्रोटोकॉल सोडून वाशिमकरांना वेळ दिला. वाशीम जिल्हा उपकेंद्र संघर्ष समितीचे दिलीप जोशी यांनी राज्यपालांना याबबात सविस्‍तर माहिती दिली.

यावेळी जोशी म्‍हणाले, अनेक वर्षापासून उपकेंद्र वाशीम व्हावे यासाठी कायदेशीर प्रयत्न करुन,सर्व बाबींची पूर्तता करूनही अद्यापपर्यंत हे उपकेंद्र वाशीमला व्हावे यासाठी कोणतीच सकारात्मक पाऊले उचलल्या गेली नाहीत. वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा असून त्यामुळे बजेटरी प्रोव्हिजन सहज शक्य होऊ शकते असे ते म्‍हणाले.

याविषयी उपकेंद्र वाशीमला व्हावे यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सकारात्मकता दर्शविली. कृषीमंत्री अब्दुल सत्तारही यावेळी उपस्थित होते. त्यांनाही याबाबत सविस्‍तर माहिती देण्यात आली.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT