लातूर

लातुरमध्ये चार मजली इमारतीला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मोहन कारंडे

लातूर, पुढारी वृत्तसेवा : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजिक असलेल्या एका चार मजली इमारतीला आग लागली. यामध्ये तिघांचा आगीत होरपळून व धुरात गुदमरून मृत्यू झाला. सुनील शिवाजीराव लोंढे (वय ५८), प्रमिला सुनील लोंढे (वय ५०) आणि कुसूम शिवाजीराव लोंढे (वय ८०) अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता ही दुर्घटना घडली. आगीचे नेमके कारण समजू शकलेलं नाही.

या आगीत एक स्टुडिओ व ऑटोमोबाईल दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यास आग लागली व बघता बघता आगीचे लोट चौथ्या मजल्यापर्यंत पोहचले. अग्निशमन दल तातडीने पोहचले, सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमनच्या जवानांना यश आले. या आगीत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकलेले नाही, पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT