Jalna crime 
जालना

Jalna crime: फेक पत्त्याच्या जुगारावर पारध पोलिसांचा छापा; अन्वापाड्यातील तिघे ताब्यात, २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्वापाड्यातील आरोपींवर पारध पोलिसांची कारवाई झाल्याने परिसरात जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे

पुढारी वृत्तसेवा

सागर देशमुख

पारध : अन्वा येथील पीरबाबा दर्ग्याच्या बाजूला स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या फेक पत्त्याच्या जुगारावर पारध पोलिसांनी बुधवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत अन्वापाडा, ता. भोकरदन येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर एक जण फरार झाला. पोलिसांनी चार दुचाकी व रोख रकमेसह तब्बल २ लाख ५१ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आल्या येथील पीरबाबा दर्ग्याच्या बाजूला स्मशानभूमीजवळ काही जण फेक पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ४.५५ वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गजानन चतुरलाल सिंगल, आकाश यानेश्वर गवळी आणि मोतीराम पंडित फाळके, तिघेही रा. अन्वापाडा, ता. भोकरदन, जि. जालना, यांना ताब्यात घेण्यात आले. तर सागर दांडगे, रा. अन्वापाडा, हा पोलिसांच्या कारवाईदरम्यान फरार झाला.

कारवाईत गजानन सिंगल याच्याकडून ५२० रुपये रोख व ६५ हजार रुपये किमतीची एचएफ डिलक्स दुचाकी, आकाश गवळी याच्याकडून ४५० रुपये रोख व ५५ हजार रुपये किमतीची हिरो फॅशन प्रो दुचाकी, तर मोतीराम फाळके याच्याकडून ६५० रुपये रोख व ६० हजार रुपये किमतीची बजाज डिस्कव्हर दुचाकी जप्त करण्यात आली. फरार आरोपी सागर दांडगे याची ७० हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.

या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाले करीत आहेत. अन्वापाड्यातील आरोपींवर पारध पोलिसांची कारवाई झाल्याने परिसरात जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT