Jalna Crime | पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली फिर्यादी महिलाच अखेर आरोपी; न्यायालयीन कोठडी

भोकरदनजवळील अलापूर येथील पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या जाचाला कंटाळूनच पतीने जीवन संपविल्याचे स्पष्ट
Bhokardan Husband Death Investigation
अनिता कैलास मिरकरPudhari
Published on
Updated on

Bhokardan Husband Death Investigation

भोकरदन : पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा बनाव रचून प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल करणारी महिलाच अखेर पोलीस तपासात आरोपी निष्पन्न झाली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या जाचाला कंटाळूनच पतीने जीवन संपविल्याचे स्पष्ट झाले. भोकरदन पोलिसांनी पत्नी अनिता कैलास मिरकर हिला अटक केली. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय?

३० ते ३१ जुलैच्या दरम्यान भोकरदनजवळील अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर (वय ४५) यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. याप्रकरणी कैलास यांची पत्नी अनिता मिरकर हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी साबेर शाह सादिक शाह याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला होता.

Bhokardan Husband Death Investigation
Jalna News : 'माविम'च्या सहयोगिनींनी गिरविले विषमुक्त पोषण बागेचे धडे

पोलीस तपासात सत्य आले समोर

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला. मृत कैलास यांच्या आई वत्सलाबाई मिरकर आणि इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच अनिता मिरकर व संशयित साबेर शाह यांच्या मोबाईलचे सीडीआर (CDR) तपासले असता, दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले. हे दोघे मिळून कैलास यांना सतत मानसिक त्रास देत होते, ज्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

तपासाअंती भोकरदन पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी फिर्यादी अनिता मिरकर हिलाच सह-आरोपी केले. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news