

Jalna Crime News : Wife beaten with stick for not going to work
जालना, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी कामावर जाणाऱ्या पत्नीला अटकाव करत तिच्यावर लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना सुंदरनगर (चंदनझिरा) येथे घडली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिसांत पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चंदनझिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरनगर येथील रहिवासी नगमा महेबुब खान (वय ३०) या मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. शुक्रवार, (दि. २१) रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्या कामावर निघत असताना पती महेबुब इब्राहिम खान याने तू कामाला जायचे नाही असे म्हणत रोखले. त्यावर नगमा यांनी तुम्ही घरखर्चाला पैसे आणून द्या, मी कामाला जात नाही असे म्हटले.
या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या महेबुबने पत्नीला शिवीगाळ करत तिचे केस पकडून तोंडावर चापटा मारल्य त्यानंतर लाकडी काठीने पाठीवर मारू गंभीर दुखापत केली. पुन्हा कामाल गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिल तब्सुम कलामनशाह यांनी भांडप् सोडवले. घटनेनंतर पीडितेने चंदनझि पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरू आरोपी पती महेबुब खान याच्याविरु भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.