आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : बोथी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी शिवानी वावधाने या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा यासाठी मोर्चा काढण्यात आला. गुरुवार दिनांक २८ रोजी येथील पोलिस ठाण्यावर आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. बोथी येथील आश्रम शाळेमध्ये शिवानी बावधने या दहावीच्या विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेला आज आठवडा उलटला आहे. पण, आरोपी मात्र शाळेच्या सभोवताल शाळेमध्ये मोकाट फिरत असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. तसे निवेदन भारतीय आदिवासी पँथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आज आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनला देण्यात आले.
यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि गार्डनवर आत्महत्येला जबाबदार असल्याच्या कारणावरून व तशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पण त्यांना अटक झाली नसून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. तसेच सीसीटीव्हीचे फुटेज देखील गायब होण्याची व त्या छेडछाड करण्याची घटना घडू शकते. तसेच आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थीनीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना येत्या दोन दिवसात अटक करावी अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली.
नवीन बस स्टॅण्डपासून आखाडा बाळापूर पोलीस ठाणेमध्ये हा मोर्चा आला. मोर्चामध्ये प्रशांत माधवराव बोडके संस्थापक अध्यक्ष आदिवासी त्यांचा संघटना महाराष्ट्र तसेच प्रशांत बोडके बाबुरावजी खंदारे दशरथराव काळे, तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ तुकाराम जटाळे सामाजिक कार्यकर्ते ओम कदम, सरपंच वारंगा फाटा, प्रमोद खोपचे, सुरेखाताई खुडे, जनाबाई काळे, सुरेख वावधने किमान दीडशे ते दोनशे स्त्री-पुरुष मोर्चामध्ये सामील होते.
पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या मोर्चाची आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पीसी बोधनापोड, पोलीस निरीक्षक शिवाजी बोंड ले पोलीस निरीक्षक प्रसाद पोलीस कर्मचारी यांनी मोर्चेकर्याचे म्हणणे ऐकून घेतले. आपले म्हणणे ज्यांच्याकडे तपास आहे, ते सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कांबळे यांच्याकडे आम्ही आपल्या भावना मांडू अशी ग्वाही उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी बाबुराव खंदारे उपस्थित होते.