मराठवाडा

हिंगोली: ट्रक-बसची समोरासमोर धडक; चालकासह २५ प्रवासी जखमी

अविनाश सुतार

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : वसमतकडे जाणाऱ्या एसटी बसची परभणीकडून येत असलेल्या गॅसवाहक ट्रकसोबत वगरवाडीजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. तर चालकासह चार प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि.१५) सायंकाळी पाच वाजता झाला.

औंढा नागनाथ बसस्थानकातून बस (२०बी एल ३९७१) वसमतकडे रवाना झाली. तर याच वेळी गॅसच्या रिकाम्या टाक्या घेऊन एक ट्रक (एएम एच. बी ई. २६६६) छत्रपती संभाजीनगरकडे निघाला. आज सायंकाळी पाच वाजता वगरवाडीजवळ पुलावर बस आणि ट्रक समोरासमोर धडकले. यात चालकाच्या बाजूने बसचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले. यातील चालक रुस्तुम सारंग, कोंडबा जाधव व इतर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

महामार्गावर मधोमध दोन्ही अपघातग्रस्त वाहने अडकली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी स्थानिक नगरसेवक तसेच इतर वाहनधारकांनी अपघातग्रस्त प्रवाशांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी मदत केली.
खासदार हेमंत पाटील हे नांदेडकडे जात असताना हा अपघात झाला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना खा. पाटील यांनी स्वतःच्या गाडीमधून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT