मराठवाडा

बीड : केज येथे आढळला अर्धवट जळालेला मानवी मृतदेह

मोनिका क्षीरसागर

धारूर (जि. बीड),पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात आडस-होळ रस्त्यावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार घातपाताचाच असण्याची शक्यता येथील नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

घटना अशी की, केज तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावरील वेदांत साधनास्थळाजवळ काही अंतरावरच अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडताच युसुफ वडगाव पोलीसांकडून घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला.

मृत व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या बुचाडात जाळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे. मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे. मृतदेह नेमका महिलेचा की, पुरुषाचा याचा अंदाजही येत नाही.

हेही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT