तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : 2024 पूर्वी मराठवाडा कृष्णा सिंचन योजना मधून तुळजापूर येथे पाणी आणण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्धार आहे. या योजनेची पाहणी करण्यासाठी दि. 16 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करणार आहेत. अशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर येथे येणार आहेत. येथे कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर ते तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार आहेत. यानंतर तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा नवा आराखडा पावर पॉइंट प्रेसेंटेशन द्वारे त्यांना दाखविण्यात येणार आहे. याविषयी उपमुख्यमंत्री कोणती घोषणा करणार आहेत याची आम्हाला देखील उत्सुकता आहे असे आमदार पाटील म्हणाले.
नळदुर्ग येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने तसेच 1626 कोटी रुपये मराठवाडा कृष्णा सिंचन योजनेसाठी शिंदे फडणवीस सरकारने दिलेले आहेत. याची सुधारित मान्यता देण्यात आली आहे. एलआयसी अंतर्गत टप्पा क्रमांक एक व दोन ही लिफ्टची योजना असून त्याचे काम सुरू करण्याच्या अनुषंगाने टेंडर आणि वर्क ऑर्डर झालेले असून कामाची सुरुवात देखील झाली आहे. 2024 मध्ये पाणी यावे यासाठी सरकारचे कसोशीने प्रयत्न सुरू असून 2001 या योजनेला तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी मान्यता दिलेली असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
पांगर दर वाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर धाराशिव येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते शेतकरी आणि जनतेने उपस्थित राहावे असे आव्हान यानिमित्ताने आमदार राणा जगदीतपाटील यांनी केले.
हेही वाचा;